सौरभ श्रीवास्तव यांचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही. तरीही त्यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे तिकीट मागे घ्यावं, यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
2/5
पक्षात घराणेशाही कायम राहिली तर कमळ फुलणारच नाही, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
3/5
एवढंच नाही तर उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते केशव प्रसाद मौर्य, ओम माथूर आणि सुनील ओझा काशी येथील बैठकीसाठी गेले, तेव्हा त्यांनाही विरोधाचा सामना करावा लागला.
4/5
या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विद्यमान आमदाराच्या मुलाला तिकीट दिल्याने भाजपमध्ये घराणेशाही असल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन सौरभ श्रीवास्तव आणि त्यांची आई विद्यमान आमदार डा ज्योत्सना यांचे पोस्टर जाळले.
5/5
वाराणसी : वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरु आहे. कँट विधानसभा मतदारसंघासाठी तिकीट दिलेल्या उमेदवाराला या कार्यकर्त्यांचा विरोध आहे.