हरवलेलं पॅन कार्ड मिळवण्यासाठी किंवा माहिती बदलण्यासाठी देखील हीच पद्धत आहे.
2/11
अर्ज संबंधित विभागाला मिळाल्यानंतर अर्जाची स्थिती वेबसाईटच्या माध्यमातून ट्रॅक करता येते.
3/11
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत हा फॉर्म आयकर विभागाला पाठवावा लागतो. फॉर्म संबंधित विभागाला मिळाल्यानंतर अर्जदाराला कळवलं जातं.
4/11
भारतातील कोणत्याही पत्त्यावर पॅन कार्ड मागवण्यासाठी ऑनलाईन पैसे भरावे लागतात. यासाठी 96 रुपये शुल्क आहे. अनिवासी भारतीयांसाठी 962 रुपये शुल्क आहे. लिफाफ्यावर अॅकनॉलेजमेंट नंबर लिहावा लागतो. ऑनलाईन पैसे भरल्यानंतर अॅकनॉलेजमेंट नंबरसह 49-ए फॉर्मची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
5/11
या फॉर्मची प्रिंट आयकर विभागाला वेबसाईटवर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी लागते. फॉर्ममध्ये जी कागदपत्र तुम्ही नमूद केली आहेत, त्या कागदपत्रांच्या प्रती आयकर विभागाला पाठवाव्या लागतात.
6/11
फॉर्म सबमिट झाल्यानंतर 15 अंकी अॅकनॉलेजमेंट नंबर दिला जातो.
7/11
अॅकनॉलेजमेंट फॉर्मच्या प्रिंटवर पासपोर्ट फोटो लावावा. हाच फोटो पॅन कार्डवर वापरला जातो.
8/11
नवीन पॅन कार्ड पाहिजे असल्यास 49-ए फॉर्म भरावा.
9/11
यामध्ये जाताच असे पर्याय दिसतील. नवीन कार्ड पाहिजे असल्यास एक नंबरचा पर्याय निवडावा. हरवलेलं पॅन कार्ड देखील मिळवता येतं, तसंच पॅन कार्डवर नाव, पत्ता अशी माहिती चुकली असल्यास दुरुस्त करता येते.
10/11
tin.tin.nsdl.com या वेबसाईटला भेट देऊन आयकर विभागाच्या पॅन कार्ड युनिटमध्ये जाऊन क्लिक करावं..
11/11
पॅन कार्ड काढण्यासाठी अगदी सोपी ऑनलाईन पद्धत उपलब्ध आहे. यासाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या पॅन कार्ड मिळवता येतं. पॅन कार्ड मिळवण्याच्या सोप्या टीप्स..