एक्स्प्लोर
वेळात वेळ काढून गंभीर शहीदांच्या घरी, मुलांना मॅचसाठी निमंत्रण
1/8

गौतम गंभीर त्याच्या संस्थेमार्फत शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत आहे. जोपर्यंत त्यांना शिकायचं आहे, तोपर्यंत गंभीर त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. सध्या गंभीरची संस्था 12 कुटुंबातील 18 मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत आहे.
2/8

मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळत आहे.
3/8

दरम्यान, आयपीएलच्या 11 व्या मोसमात सातत्याने पराभवाला सामोरं जावं लागत असल्याने, गौतम गंभीर दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला.
4/8

नक्षलवाद्यांनी सुकमात केलेल्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले होते, त्यानंतर गंभीरने संस्था सुरु करुन, शहिदांच्या मुलांना मदतीचा हात दिला.
5/8

गंभीरने छत्तीसगडमधील सुकमा आणि काश्मीरमध्ये शहीद झालेल्या काही जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गंभीरने शहीद जवानांच्या मुलांशी गप्पा मारल्या. इतकंच नाही तर त्याने आयपीएलचा सामना पाहण्यासाठी निमंत्रण दिलं.
6/8

या भेटीनंतर गंभीरने शहीदांच्या मुलांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.
7/8

त्यानंतर आता गंभीरने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधून वेळात वेळ काढून, सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
8/8

टीम इंडियाचा संवेदनशील क्रिकेटपटू गौतम गंभीरने वेळोवेळी आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. गंभीरने नक्षलवाद्यांनी केलेल्या सुकमा हल्ल्यातील 25 शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. शिवाय जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अब्दुल रशीद यांच्या मुलीचे अश्रू पाहून हेलावल्या गंभीरने तिच्याही शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला आहे.
Published at : 27 Apr 2018 02:02 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement

















