अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेडमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होतात. ते सर्व 26 जानेवारीच्या राजपथावरील परेडप्रमाणे भारतीय संस्कृती आणि विविध देखावे,चित्ररथ, नृत्य इत्यादी सादर करतात. यावर्षी प्रथमच छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्कच्या वतीने या इंडिया परेड मध्ये "शिवछत्रपती कीर्ती रथ" सादर करण्यात आला.
3/9
न्यूयॉर्कमधील इंडिया परेडसाठी भारतातून प्रमुख पाहुणे दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन, अनुपम खेर, श्रृती हसन तसेच क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स हे उपस्थित होते. फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स ह्या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन केले जाते.
4/9
शिवाजी महाराजांची कीर्ती, कर्तृत्व आणि विचारांचा प्रसार जगभर व्हावा यासाठी छत्रपती फाऊंडेशन कार्यरत आहे. त्यातील एक भाग हा कीर्तीरथ आहे.
5/9
या कीर्तीरथाचे स्वागत सर्व भारतीयांसह न्यूयॉर्कवासीयांनी मोठ्या उत्साहात केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष न्यूयॉर्कमधील इंडिया परेडमध्ये घुमला. हा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा क्षण आहे.
6/9
New York Parade Life या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तिरथाला "बेस्ट रथ " म्हणत शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मूळांशी जोडला आहे असे नमूद केले. यावेळी शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, जिजाऊंची स्वराज्य संकल्पना आणि हिंदवी स्वराज्याचा इतिहासाबद्दल माहितीपत्रक सर्व उपस्थितांना वाटण्यात आले.
7/9
कीर्तीरथासोबत अल्बनी (न्यूयॉर्क स्टेट) येथील 100 हून अधिक चमूने ढोल -ताशा आणि लेझीम पथकातून महाराष्ट्रातील लोककलेचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतल्या लोकांना दिला. प्रचंड उत्साहात आणि हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोषात जगाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता.
8/9
या रथावर पुढच्या भागात शिवाजी महाराज आणि मावळ्यांची भूमिका युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे जिवंत केली. तर मागच्या भागात राष्ट्रमाता जिजाऊ बाळ शिवबांना मार्गदर्शन करत असल्याचा चित्ररथ दाखवण्यात आला.
9/9
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जगभरात पाहायला मिळाला. हा उत्साह आजूनही कायम आहे. न्यूयॉर्कमधील भारतीयांनी त्याच निमित्ताने 19 ऑगस्ट रोजी इंडिया डे परेडचं आयोजन केलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तीरथ छत्रपती फाऊंडेशनच्यावतीने सादर करण्यात आला.