मोदींचे परदेश दौरे नेहमी चर्चेत असतात. विशेषतः अमेरिका दौऱ्याची चर्चा जास्त होते. मात्र मागील वर्षी मोदींचं अमेरिकेत जे जंगी स्वागत झालं ते जगाच्या भुवया उंचावणारं होतं.
2/10
मोदींनी यावर्षी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातील काही मुद्दे आश्चर्यचकित करणारे होते. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये बलुचिस्तानच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा पंतप्रधानांनी भाषणामध्ये घेतला. त्यानंतर बलुचिस्तानच्या नेत्यांनी मोदींचे आभार मानले.
3/10
सप्टेंबर 2015 मध्ये अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना दहशतवादावर मोदींनी केलेल्या आक्रमक भाषणाची जगभर चर्चा झाली.
4/10
दक्षिण आफ्रिकेतील देश तंजानियामध्ये ड्रम वाजवतानाचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. तंजानियामध्ये पंतप्रधान मोदींचं पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदींनी तंजानियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत ड्रम वाजवण्याचा आनंद घेतला.
5/10
पंतप्रधानांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिन पिंग याचं खास स्वागत केलं. शी चिन पिंग यांनी भारत दौऱ्याची सुरुवात राजधानी दिल्लीऐवजी गुजरातमधून केली. एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी राजधानी ऐवजी एखाद्या शहरातून दौरा सुरु करण्याची ही पहिलीच वेळ होती.
6/10
अफगाणिस्तान दौऱ्यावरुन परतताना पंतप्रधान मोदींनी सर्व जगाला आश्चर्यचकित केलं. कसल्याही पूर्वनियोजनाशिवाय मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
7/10
मोदींनी 2014 ची दिवाळी जवानांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि सियाचिनमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी हा प्रेरणादायी क्षण होता.
8/10
मोदी 20 मे 2014 रोजी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. हा पंतप्रधानांच्या आयुष्यातील खास दिवस होता. हा दिवस जगभरात चर्चेचा विषय बनला.
9/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिनी गुजरातमध्ये कसल्याही पूर्वकल्पनेशिवाय आईचा आशिर्वाद घेण्यासाठी गेले. मोदींच्या अशाच काही खास गोष्टी आहेत, ज्या सरप्राईज म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत.
10/10
मागच्या वर्षी अमेरिका दौऱ्यात फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची आणि मोदींच्या भेटीची जगभर चर्चा झाली.