एक्स्प्लोर
तुमच्या बागेत याची रोपे असणे आरोग्यासाठी गरजेचे

1/6

पुदीना : जर तुम्ही तुमच्या टेरेस गार्डनवर पुदीनाची लागवड केली तर तुम्हाला गरजेच्या वेळी पोटाच्या विकारांवर उपाय मिळेल.
2/6

कोरफड: कोरफड हे अनेक आजारांवरील रामबाण आहे. त्यामुळे पुर्वी अनेकांच्या घरात कोरफडाचे झाड पाहायला मिळायचे. कोरफडीच्या रसाचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये होतो. तसेच याच्या रसाच्या सेवनाने अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे रोग बरे होतात.
3/6

लिंबू: पोटाच्या विकारांवर लिंबाचा रस गुणकारक आहे. त्याच्यात क जीवनसत्त्व असल्याने काविळीच्या रुग्णांसाठी वेळप्रसंगी त्याचा उपयोग होतो. तसेच लहान मुलांना अपचन होत असल्यास लिंबाचा वापर उत्तम असल्याने तुमच्या बागेत लिंबाचे झाड असणे आवश्यक आहे.
4/6

टोमॅटो: टोमॅटोचे आपल्या आहारात विशेष महत्त्व नसले तरी त्याचा कोशिंबीरीसोबतच आहारात वापर केला जातो. टोमॅटोमध्ये अ व क जीवनसत्त्व असल्याने त्याचा आहार वापर असणे फायद्याचे आहे.
5/6

कोथिंबीर: आपल्या प्रत्येक आहारा कोथिंबीरीच्या पानांचा वापर नित्याचाच असतो. कोथिंबीरीत 'अ' जीवनसत्त्व असल्याने याचा आहारात वापर असणे गरजेचे आहे.
6/6

तुळस : तुळस ही आरोग्य वाहिनी आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या दारासमोर तुळशीचे रोपटे लावलेच असते. विशेष म्हणजे, तुळशीच्या रोपांमुळे तुम्हाला डासांच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
Published at : 05 Jul 2016 06:53 PM (IST)
Tags :
Gardenअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
