एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात स्वस्त आयफोन मिळणं कठीणच, अॅपलच्या योजनांना धक्का!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111136/apple-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111502/iphone21-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/8
![भारत सरकारच्या मते, अशा बिजनेसमुळे देशात ई-कचरा वाढेल. जे नष्ट करणं फारच कठीण असतं. देशात ई-कचरा वाढत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी काही योजना सरकार येऊ देण्याचा विचारात नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111151/apple-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत सरकारच्या मते, अशा बिजनेसमुळे देशात ई-कचरा वाढेल. जे नष्ट करणं फारच कठीण असतं. देशात ई-कचरा वाढत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी काही योजना सरकार येऊ देण्याचा विचारात नाही.
3/8
![अॅपल आपले जुने आयफोन रीफर्बिश (वापरलेले मोबाइल नव्याने बनवून) अमेरिकेसह अनेक देशात विक्री करते. हे नव्या आयफोनपेक्षा बरेच स्वस्त असतात. जास्त किंमत असल्यानं अनेक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे असे स्वस्त स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणण्याचा अॅपलचा विचार होता. पण तूर्तास अॅपलला वाट पाहावी लागणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111148/apple-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल आपले जुने आयफोन रीफर्बिश (वापरलेले मोबाइल नव्याने बनवून) अमेरिकेसह अनेक देशात विक्री करते. हे नव्या आयफोनपेक्षा बरेच स्वस्त असतात. जास्त किंमत असल्यानं अनेक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे असे स्वस्त स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणण्याचा अॅपलचा विचार होता. पण तूर्तास अॅपलला वाट पाहावी लागणार आहे.
4/8
![अॅपलचे सीईओ टीम कूक यांना भारतात आयफोनच्या विक्रीचा खप वाढवायचा आहे. भारत दौऱ्यात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगबाबतही चर्चा केली होती. तसेच येथे रिटेल स्टोअर सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण की, भारतीय बाजारात अॅपलची अवघी 2 टक्के भागीदारी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111146/apple-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलचे सीईओ टीम कूक यांना भारतात आयफोनच्या विक्रीचा खप वाढवायचा आहे. भारत दौऱ्यात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगबाबतही चर्चा केली होती. तसेच येथे रिटेल स्टोअर सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण की, भारतीय बाजारात अॅपलची अवघी 2 टक्के भागीदारी आहे.
5/8
![एवढंच नव्हे तर अॅपलचं भारतात रिटेल स्टोअर सुरु करण्याची योजनाही धूसर होत चालली आहे. लोकल प्रोडक्ट खरेदी न करण्याला वाणिज्य मंत्रालय तयार असलं तरी अर्थ मंत्रालयाची याबाबत भूमिका वेगळी आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111143/apple-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढंच नव्हे तर अॅपलचं भारतात रिटेल स्टोअर सुरु करण्याची योजनाही धूसर होत चालली आहे. लोकल प्रोडक्ट खरेदी न करण्याला वाणिज्य मंत्रालय तयार असलं तरी अर्थ मंत्रालयाची याबाबत भूमिका वेगळी आहे.
6/8
![टीम कूकनं मागील भारत दौऱ्याच्या दरम्यान फारच आशेनं म्हटलं होतं की, भारतात अॅपल हजारो वर्षापर्यंत राहिल. तसेच भारतात अॅपलचं भविष्य चांगलं आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोनला नव्या वॉरंटीसह ते विकणार होते. सध्या चीनसह अनेक देशात अॅपलच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे भारत ही मोठी बाजारपेठ असून तिथे ही अॅपलच्या विक्रीचा मानस टीम कूक यांचा होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111141/apple-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम कूकनं मागील भारत दौऱ्याच्या दरम्यान फारच आशेनं म्हटलं होतं की, भारतात अॅपल हजारो वर्षापर्यंत राहिल. तसेच भारतात अॅपलचं भविष्य चांगलं आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोनला नव्या वॉरंटीसह ते विकणार होते. सध्या चीनसह अनेक देशात अॅपलच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे भारत ही मोठी बाजारपेठ असून तिथे ही अॅपलच्या विक्रीचा मानस टीम कूक यांचा होता.
7/8
![काही दिवसांपूर्वीच अॅपलचे सीईओ टीम कूक हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जुने आयफोन बाजारात उपलब्ध होतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111138/apple-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वीच अॅपलचे सीईओ टीम कूक हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जुने आयफोन बाजारात उपलब्ध होतील.
8/8
![भारतात जुने आयफोन विकण्याचं अॅपलचं स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही. कंपनीनं याआधी देखील भारत सरकारची परवानगी मागितली होती. पण याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपलसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/31111136/apple-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतात जुने आयफोन विकण्याचं अॅपलचं स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही. कंपनीनं याआधी देखील भारत सरकारची परवानगी मागितली होती. पण याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपलसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे.
Published at : 31 May 2016 11:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)