एक्स्प्लोर
भीषण अपघातात स्कूल बसचा चक्काचूर, 13 मुलांचा मृत्यू
1/4

अलीगंजचे एसडीएम मोहन सिंह यांच्या माहितीनुसार, अपघातात सुमारे 40 मुलं जखमी झाले आहे. 25 मुलांवर अलीगंजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 15 विद्यार्थ्यांवर खासगी नर्सिंग होममध्ये उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना सैफईमध्ये पाठवलं जात आहे.
2/4

उत्तर प्रदेशात स्कूल बस आणि वाळूच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलं गंभीर जखमी आहेत.
3/4

एटामधील अलीगंज परिसरात सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जेएस विद्या पब्लिक स्कूलची बस वाळूच्या ट्रकला जाऊन धडकली. या दुर्घटनेतील मृतांमध्ये केजीपासून सातवीपर्यंतचे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर ट्रकचालकही अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
4/4

दरम्यान, धुक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून मदती आणि बचाव कार्य सुरु आहे.
Published at : 19 Jan 2017 10:57 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement
Advertisement



















