एक्स्प्लोर
Motorola Edge 40 : लॉन्च होण्यापूर्वीच पाहा Motorola Edge 40 चे फोटो; फोनमध्ये आहेत भन्नाट फिचर्स
मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर जाहीर करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रूपये इतकी आहे. हा फोन लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Motorola Edge 40
1/9

सध्या बाजारात मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. अशात मोटोरोलाकडून Motorola Edge 40 स्मार्टफोन 23 मे रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे.
2/9

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमतही फ्लिपकार्टवर जाहीर करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रूपये इतकी आहे. हा फोन लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना आणखीन एक आठवडा वाट पाहावी लागणार आहे.
3/9

Motorola Edge 40 स्मार्टफोनची प्री ऑर्डर 23 मेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना हा फोन खरेदी करायची इच्छा आहे, ते फ्लिपकार्ट आणि अन्य ई- कॉमर्स वेसाईटवरू फोन ऑर्डर करू शकतात.
4/9

कंपनी ग्राहकांसाठी काही ऑफर्स देत आहे. या फोनच्या खरेदीवर EMI ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला मासिक 5,000 रूपये हप्ता भरावा लागू शकतो. या मोबाईलवर 2,000 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे.
5/9

मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोनचे काही फोटोही समोर आले आहेत. यामुळे तु्म्हाला या फोनचा लूक आणि डिझाईनची थोडी कल्पना येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच FHD आणि कर्व्ड OLED डिस्प्ले उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. यामुळे डिस्प्लेची गुणवत्ता चांगली मिळते.
6/9

हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी तीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू या व्हेरियंटचा समावेश आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर, 8GB LPDDR4X रॅम आणि 256GBUFS 3.1 स्टोरेज सपोर्ट मिळणार आहे.
7/9

Motorola Edge 40 मोबाईलमध्ये 4400mAh इतकी शक्तीशाली बॅटरी देण्यात आहे. या फोनची बॅटरी 68 वॅटची फास्ट चार्जिंग आणि 15 वॅटच्या वायरलेस चार्जिंगसोबत उपलब्ध होणार आहे. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 2 वर्षापर्यंत OS अपडेट मिळणार आहे आणि 4 वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेटही उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना Dolby Atmos चा स्पिकरही मिळणार आहे.
8/9

Motorola Edge 40 मोबाईलमध्ये 4400mAh इतकी शक्तीशाली बॅटरी देण्यात आहे. या फोनची बॅटरी 68 वॅटची फास्ट चार्जिंग आणि 15 वॅटच्या वायरलेस चार्जिंगसोबत उपलब्ध होणार आहे.
9/9

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 2 वर्षांपर्यंत OS अपडेट मिळणार आहे आणि 4 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेटही उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना Dolby Atmos चा स्पिकरही मिळणार आहे.
Published at : 22 May 2023 02:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
























