एक्स्प्लोर
RCB vs CSK : चेन्नईचा 13 धावांनी पराभव, 'हे' आहेत बंगळुरुच्या विजयामागील महत्त्वाचे मुद्दे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/4e24d614985e64c908db2934425a1d23_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
chennai superkings vs Royal challengers bangalore
1/8
![यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 49 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488003a953.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 49 व्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुने चेन्नई सुपरकिंग्सचा (RCB vs CSK)13 धावांनी पराभव केला आहे.
2/8
![सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज बंगळुरुच्या गोलंदाजांनी 174 धावाचं आव्हानात्मक लक्ष्य डिफेन्ड करायचं होतं, जे काहीसं अवघड असलं तरी गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हे करुन दाखवलं. यावेळी हर्षलने महत्त्वाची मोईन अलीची विकेट घेत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चेन्नईकडून कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/8cda81fc7ad906927144235dda5fdf1560ecc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज बंगळुरुच्या गोलंदाजांनी 174 धावाचं आव्हानात्मक लक्ष्य डिफेन्ड करायचं होतं, जे काहीसं अवघड असलं तरी गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हे करुन दाखवलं. यावेळी हर्षलने महत्त्वाची मोईन अलीची विकेट घेत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर चेन्नईकडून कॉन्वेची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
3/8
![पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून कोहली आणि फाफने उत्तम सुरुवात केली. पण फाफ 38 धावांवर बाद होताच. कोहलीही 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा डाव ढासळेल असे वाटत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/032b2cc936860b03048302d991c3498f8597c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून कोहली आणि फाफने उत्तम सुरुवात केली. पण फाफ 38 धावांवर बाद होताच. कोहलीही 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा डाव ढासळेल असे वाटत होते.
4/8
![पण त्याचवेळी माहिपाल लोमरोरने 42 धावांची तुफानी खेळी करत एक उत्तम धावसंख्येकडे संघाला नेलं. अखेरच्या षटकात कार्तिकने 26 धावांची फटकेबाजी करत संघाला 173 धावा करुन दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd977818.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण त्याचवेळी माहिपाल लोमरोरने 42 धावांची तुफानी खेळी करत एक उत्तम धावसंख्येकडे संघाला नेलं. अखेरच्या षटकात कार्तिकने 26 धावांची फटकेबाजी करत संघाला 173 धावा करुन दिल्या.
5/8
![174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef454ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
174 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात ठिक झाली. सलामीवीर डेवॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली खेळी करण्यास सुरुवात केली.
6/8
![गायकवाड 28 धावा करुन बाद होताच कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/18e2999891374a475d0687ca9f989d83bbf07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गायकवाड 28 धावा करुन बाद होताच कॉन्वेने झुंज कायम ठेवली. पण त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 37 चेंडूत 56 धावा करुन तोही बाद झाला.
7/8
![त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/30e62fddc14c05988b44e7c02788e18773a54.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर मोईन अलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा पण हर्षलने त्याला 34 धावांवर बाद करत चेन्नईच्या अडचणी वाढवल्या.
8/8
![अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला. त्यामुळे चेन्नईचे कॉन्वे सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने सामना 13 धावांनी त्यांनी गमावला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/ae566253288191ce5d879e51dae1d8c34d226.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेर हेझलवुडने धोनीला बाद करत चेन्नईपासून विजय फार दूर नेला. त्यामुळे चेन्नईचे कॉन्वे सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने सामना 13 धावांनी त्यांनी गमावला.
Published at : 05 May 2022 08:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)