Rohit Pawar : भाजपवाल्यांनो माझ्याशी लढायची हिंमत नाही का, आईला कशाला मध्ये आणता, निलेश घायवळ प्रकरणावरुन रोहित पवार संतापले
Rohit Pawar : माझ्या आईचा फोटो वापरून भाजप असे गलिच्छ राजकारण करत असेल तर त्याचा साधा आणि सरळ अर्थ असा निघतो कि, मला समोर जायला भाजप कुठंतरी घाबरते. अशी बोचरी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे.

Rohit Pawar on BJP : भाजपवाल्यांनो तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची?
पुण्यातील निलेश घायवळ (Nilesh ghayawal) प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून पुणे गुंडगिरीमागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. दरम्यान यांच मुद्दयांवरून भाजपकडून आमदार रोहित पवार यांना लक्ष करण्यात आलं होतं. यावर प्रत्तुत्तर देतांना रोहित पवारांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. आईला कशाला मध्ये आणता? तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची? मी राजकारणात आहे. तुम्हाला काय काढायचं ते काढा, आम्हाला जे काय काढायचं ते काढू, असेही रोहित पवार म्हणाले.
Rohit Pawar Criticized on BJP भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय?
योगेश कदम यांनी बंदुकीचे लायसन्स कुणाच्या सांगण्यावरून दिले हे आज रामदास कदम यांनीच स्पष्ट केले आहे. मी आधीच बोललो होतो सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून लायसन्स दिले आहे. त्याला आज रामदास कदम यांनी दुजोरा दिला आहे. मात्र यावरून भाजपच्या पोटात दुखायचं कारण काय? असा प्रश्नही रोहित पवारांनी यावेळी केलाय.
Rohit Pawar Nilesh Ghaywal : रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळ सक्रीय?
निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांचे मूळ गाव हे जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून 10 किमीवर असलेल्या सोनेगावचे आहेत. सचिन घायवळ हा पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळ हा सक्रीय होता. तो जरी राजकारणात सहभाग घेत असला तरी तो शिक्षक असल्याने प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पदावर नव्हता. सन 2019 ते 2024 पर्यंत रोहित पवारांसोबतच घायवळ बंधू हे देखील होते. सन 2019 मध्ये रोहित पवारांना राजकीय मदत केल्याने स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर राजकीय पद यावर घायवळ समर्थकांची वर्णी लागावी म्हणून सचिन घायवळकडून प्रयत्न व्हायचे. त्यावरुन, आमदार रोहित पवार आणि त्यांच्यात मतभेद झाले असल्याची चर्चा स्थानिक जामखेड मतदारसंघात आहे.
ही बातमी वाचा:
























