एक्स्प्लोर
Mumbai Indians : मुंबईनं ज्यांच्यासाठी मोजले करोडो रुपये, ते खेळाडू सुपरहिट की फ्लॉप, कोण शेर ठरलं तर कोण झालं ढेर?
Mumbai Indians ; मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, ईशान किशन आणि हार्दिक पांड्यासारखे खेळाडू आहेत. ज्यांच्यासाठी मुंबईनं 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये मोजले आहेत.
मुंबई इंडियन्स
1/7

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून 16 कोटी रुपये मिळतात. त्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये 13 मॅचेसमध्ये 1 शतकासह 349 धावा केल्या आहेत.
2/7

ईशान किशन याला मुंबई इंडियन्सनं 15.25 कोटी रुपये मोजत संघात स्थान दिलं. मात्र, तो देखील सातत्यपूर्ण कामगिरी करु शकलेला नाही. 13 मॅचमध्ये त्यानं एका अर्धशतकासह 306 धावा केल्यात.
3/7

गुजरात टायटन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपये मोजत मुंबईनं आपल्याकडे घेत त्याला कॅप्टन केलं. मात्र, तो बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये अपयशी ठरला. त्यानं 13 मॅचमध्ये 200 धावा केल्या. तर, यंदाच्या आयपीएलमध्ये 11 विकेट मिळाल्या आहेत.
4/7

मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहला 12 कोटी रुपये मिळतात. त्यानं यावर्षी 20 विकेट मिळवत पर्पल कॅप आपल्याकडे ठेवली आहे.
5/7

ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम डेव्हिडसाठी मुंबई इंडियन्सनं 8.25 कोटी रुपये मोजले. डेव्हिडनं 13 मॅचमध्ये 241 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 45 इतकी होती.
6/7

सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सकडून 8 कोटी रुपये मिळतात. सूर्यकुमार पहिल्या तीन मॅचेसला मुकला होता. त्यानं 10 मॅचमध्ये 345 धावा केल्या. त्यात एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
7/7

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर गेराल्ड कोत्झीसाठी मुंबईनं 5 कोटी रुपये मोजले होते. कोत्झीनं 10 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुआन तुषाराला मुंबईकडून 4.8 कोटी रुपये मिळतात. तुषाराला 6 मॅचमध्ये संधी मिळाली. त्यानं 5 विकेट घेतल्या.
Published at : 15 May 2024 05:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नागपूर
मुंबई
महाराष्ट्र


















