एक्स्प्लोर
IPL 2023 Final : चेन्नई-गुजरात सामन्यात पावसाचा ख्वाडा, पुढे काय?
IPL 2023 Final : अहमदाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. मागील तीन तासांपासून पाऊस धो धो कोसळतोय...
CSK vs GT Final IPL 2023
1/8

CSK vs GT Final IPL 2023: चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. पण अहमदाबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे.
2/8

रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार ...याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही.. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार... कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.
Published at : 28 May 2023 08:57 PM (IST)
आणखी पाहा























