एक्स्प्लोर
SRH vs KKR : सनरायजर्स हैदराबादचे पाच शिलेदार, जे आयपीएल फायनल कोणत्याही क्षणी फिरवू शकतात, केकेआरपुढं ज्यांचं तगडं आव्हान
SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील फायनल थोड्याच वेळात सुरु होणार आहे. यामध्ये हैदराबादचे पाच खेळाडू केकेआरपुढं चॅलेंज निर्माण करु शकतात.

सनरायजर्स हैदराबाद
1/5

ट्रेविस हेड ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. त्यानं 567 धावा केल्या असून ज्यामध्ये एका शतकासह चार अर्धशतकांचा समावेश आहे. ट्रेविस हेड मिशेल स्टार्कचं आव्हान कसं पेलणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. मिशेल स्टार्कपुढं ट्रेविस हेड अपयशी ठरलाय.
2/5

अभिषेक शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं 15 मॅचमध्ये 482 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मानं तीन अर्धशतकं झळकावली असून तो बॉलिंग देखील करु शकतो. राजस्थान विरुद्ध त्यानं दोन विकेट घेतल्या होत्या.
3/5

राहुल त्रिपाठीनं दोन्ही क्वालिफायरमध्ये दमदार कामगिरी केली आहे. इनफॉर्म राहुल त्रिपाठी ला रोखण्याचं आव्हान केकेआरपुढं असेल. राहुल त्रिपाठीला पाच मॅचमध्ये संधी मिळाली मात्र त्यानं 156 धावा केल्या आहेत.
4/5

सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू हेनरिच क्लासेन यानं देखील दमदार कामगिरी केली आहे. हेनरिच क्लासेननं चार अर्धशतकांसह 463 धावा केल्या असून हैदराबादच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज म्हणून तो तगडी फलंदाजी करतोय.
5/5

पॅट कमिन्स हैदराबादचा कॅप्टन असून तो आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करु शकतो. पॅट कमिन्सनं 17 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीच्या लढतीत तो त्याचा अनुभव पणाला लावेल.
Published at : 26 May 2024 05:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
बातम्या
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion