एक्स्प्लोर
चेतेश्वर पुजारा vs पॅट कमिंस, तर स्मिथसमोर जाडेजाचं आव्हान; WTC फायनलमध्ये 'हे' खेळाडू आमने-सामने
आज आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपची फायनल... कसोटी विश्वविजेतेपदासाठी आजपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगणार आहे.

WTC Final 2023 | Ind vs Aus
1/8

ओव्हलच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने असतील. या सामन्यासाठी टीम इंडियानं कंबर कसली आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडियानं 2021 मध्येही या स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला होता. त्यानंतर साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून आठ विकेट्सनी पराभव झाला होता. यंदा मात्र टीम इंडियाकडे मागचा पराभव विसरून WTCच्या ट्रॉफीवर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे.
2/8

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.या मैदानावर ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक सामने खेळले आहेत. तर टीम इंडियानं कांगारुंच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांचा रेकॉर्ड फारसा खास नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं लंडनच्या ओव्हल ग्राउंडवर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियानं 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत.
3/8

चेतेश्वर पुजारा vs पॅट कमिन्स : पॅट कमिन्सविरुद्ध चेतेश्वर पुजारा हे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या लढतीत पाहायला मिळणाऱ्या लढतीपैकी एक लढत. 7 वेळा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं पुजाराला कसोटीत बाद केलं आहे. पुजाराला आतापर्यंतच्या कसोट्यांमध्ये 600 चेंडूत केवळ 172 धावा करता आल्यात.
4/8

मार्नस लॅबुशेन vs आर अश्विन : अश्विनविरुद्ध लॅबुशेनची सरासरी 63 आहे. त्यानं 3 वेळा बाद झाल्यानंतर 347 चेंडूत 190 धावा केल्या आहेत.
5/8

मोहम्मद शामी vs डेविड वॉर्नर : मोहम्मद शमीविरुद्ध डेव्हिड वॉर्नरचा स्ट्राइक रेट 81 आहे. 100 चेंडूत दोन वेळा आऊट झालेल्या वॉर्नरनं केवळ 81 धावा काढल्या आहेत. अशातच ड्यूक चेंडूनं खेळवल्या जाणाऱ्या आजच्या अंतिम सामन्या वॉर्नरसमोर शामीचं आव्हान असणार आहे.
6/8

रोहित शर्मा vs मिचेल स्टार्क : मिचेल स्टार्क अद्यार रोहितला कसोटी सामन्यात एकदाही बाद करू शकलेला नाही. मिचेल स्टार्कनं टाकलेल्या 151 चेंडूंत रोहितनं 95 धावा काढल्या आहेत.
7/8

स्टीव स्मिथ vs रविंद्र जाडेजा : रविंद्र जाडेजानं 674 चेंडूत स्मिथला 7 वेळा आऊट केलं आहे. यादरम्यान स्मिथनं 33 च्या सरासरीनं 232 धावा केल्यात.
8/8

विराट कोहली vs नाथन लायन : नाथन लायननं विराट कोहलीला 1002 चेंडूत तब्बल 7 वेळा आऊट केलं आहे. विराट कोहलीनं 73 च्या सरासरीनं 511 धावा काढल्यात.
Published at : 07 Jun 2023 12:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
