एक्स्प्लोर
WTCचं मैदान मारल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कचं ओव्हलवर सप्त्नीक सेलिब्रेशन, अॅलिसा हिलीवर नजरा खिळल्या
WTC Final: अंतिम सामना जिंकल्यानंतर मिचेल स्टार्क पत्नी अॅलिसा हिलीसोबत मैदानावर सेलिब्रेशन करताना दिसला.

WTC Final 2023
1/7

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारत टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. कालच्या विजयानंतर प्रत्येक फॉरमॅटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ बनला आहे.
2/7

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियन संघानं आणखी एक विजेतेपद पटकावलं आहे. हा सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हिलीही उपस्थित होती.
3/7

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सदस्य आणि मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हिली आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी पाचही दिवस स्टेडियमवर पोहोचली. ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयानंतर स्टार्क आणि एलिसा हिलीही मैदानावर आनंद साजरा करताना दिसली.
4/7

स्टार्कचे अभिनंदन करण्यासोबतच अॅलिसाही त्याच्यासोबत आनंद साजरा करताना दिसली. स्टार्कनं या सामन्यात गोलंदाजीत आपली जादू दाखवली आणि एकूण 4 विकेट्स घेतले. त्यासोबतच त्यानं संघाच्या दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजीनं 41 धावाही केल्या.
5/7

ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात ट्रॅव्हिस हेडनं सर्वात महत्त्वाचं योगदान दिलं. हेडनं पहिल्या डावात 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात कांगारूंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. या ऐतिहासिक विजयानंतर हेडही कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसला.
6/7

ऑस्ट्रेलिया आता जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वच्या सर्व फॉरमॅटमध्ये ICC ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. कांगारू संघानं टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात पाच दिवस आपली पकड मजबूत ठेवली होती.
7/7

या अंतिम सामन्यात कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडशिवाय स्टीव्ह स्मिथनंही शतकी खेळी साकारली. याशिवाय गोलंदाजीत स्कॉट बोलँड आणि ऑफस्पिनर नॅथन लायन यांनी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
Published at : 12 Jun 2023 11:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion