एक्स्प्लोर
Ind vs NZ: कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच 50 हून कमी धावसंख्येत गारद; पाहा 5 सर्वात कमी धावसंख्या

India vs New Zealand Test Match
1/6

न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया अवघ्या 46 धावांत ऑलआऊट झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर टीम इंडियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळताना 50 धावांच्या आत ऑलआऊट झाला आहे. (फोटो- सोशल मीडिया)
2/6

न्यूझीलंडसाठी मॅट हेन्री सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मॅट हेन्रीने अवघ्या 15 धावांत 5 बळी घेतले. त्याने सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांना बाद केले. (फोटो- सोशल मीडिया)
3/6

2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबईच्या मैदानावर टीम इंडिया अवघ्या 62 धावांत ऑलआऊट झाली होती. आता पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध अविश्वसनीय कामगिरी केली आहे. (फोटो- सोशल मीडिया)
4/6

सुमारे 37 वर्षांपूर्वी 1987 मध्ये दिल्लीच्या मैदानावर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 75 धावांत ऑलआऊट झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटीत टीम इंडिया 100 धावांच्या आत ऑलआऊट झाला होता. (फोटो- सोशल मीडिया)
5/6

2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला धक्का दिला होता. अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघ 76 धावांत ऑलआऊट झाला होता. (फोटो- सोशल मीडिया)
6/6

2008 मध्ये भारताला 76 धावांत सर्वबाद करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2015 मध्येही भारतीय संघाला धक्का दिला होता. 2015 मध्ये नागपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला 79 धावांत गुंडाळले होते. (फोटो- सोशल मीडिया)
Published at : 18 Oct 2024 07:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
