एक्स्प्लोर
IND vs ENG : इंग्लंडला मात देण्यासाठी Team India पोहोचली इंग्लंडला; BCCI नं शेअर केले फोटो

Team India
1/10

इंग्लंडला त्यांच्याच मातीत मात देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. (P.C. BCCI)
2/10

भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.(P.C. BCCI)
3/10

या फोटोंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भारत दिसत आहेत.
4/10

पण संघाचा कर्णधार रोहित शर्मा मात्र कुठेच दिसत नाही.
5/10

दरम्यान रोहित कोच राहुल द्रविड आणि इतर काही खेळाडूंसोबत नंतर इंग्लंडला रवाना होईल अशी माहितीही समोर आली आहे.
6/10

रोहित शर्मा दिसत नसल्यानं त्याचे चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयला टॅग करून अनेक प्रश्न विचारत आहेत.
7/10

सध्या ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहेत.
8/10

दुखापतीमुळे केएल राहुल या मालिकेला मुकणार आहे.
9/10

कर्णधार म्हणून रोहित शर्माच संघाचं नेतृत्त्व करेल.
10/10

यावेळी संघ एका कसोटी सामन्यासह तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल.
Published at : 16 Jun 2022 08:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
