एक्स्प्लोर
फिरकीपुढे नांगी टाकली, टीम इंडियाचा डाव 109 धावात आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे 47 धावांची आघाडी
भाराताचे दिग्गज फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरले... एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
![भाराताचे दिग्गज फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे अपयशी ठरले... एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/e4fd662f039b7153b069651d243d25571677685515285265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs AUS
1/10
![IND vs AUS, 3rd Test : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. टीम इंडियाचा डाव अवघ्या 109 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने चार बाद 156 धावा केल्या होत्या. कांगारुकडे 47 धावांची आघाडी घेतली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/2015dd6eccfac7a35e1be3a818ef2b0f2c2bb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs AUS, 3rd Test : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. टीम इंडियाचा डाव अवघ्या 109 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने चार बाद 156 धावा केल्या होत्या. कांगारुकडे 47 धावांची आघाडी घेतली आहे.
2/10
![आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. त्यांनी आधी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत सर्वबाद केलं. ज्यानंतर 156 धावा दिवस संपेपर्यंत स्कोरबोर्डवर लावल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/505ff063f37f48c3bf8a4c32f0d3d9860fd77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजचा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. त्यांनी आधी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत सर्वबाद केलं. ज्यानंतर 156 धावा दिवस संपेपर्यंत स्कोरबोर्डवर लावल्या
3/10
![इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/25368b23ad47d6ebe7cd675ecda6155fa46ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सर्वात आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं.
4/10
![ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांना गोलंदाजी दिली. पण भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/caf94b2d872792693936026a0fb7a6ebd2f32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. सर्वात आधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांना गोलंदाजी दिली. पण भारतीय फलंदाजांनी वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढण्यास सुरुवात केली
5/10
![त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/ed867eb4418cb9fd717893e85d3e5cae73093.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे लगेचच कर्णधार स्मिथने आपल्या फिरकीपटूंकडे चेंडू सोपवताच भारतीय संघ ढासळताना दिसला. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या.
6/10
![ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/227d22804b3437b04a3b11d03b799a64bc2a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला.
7/10
![दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/81461918a7d6bd0cff84b6113b227218736f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्ली कसोटीतून रेड-बॉल क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने दुसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. कुहनेमनला पदार्पणाच्या कसोटीत केवळ दोन विकेट मिळाल्या होत्या. पण आपल्या दुसऱ्या कसोटीत कुहनेमनने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला.
8/10
![कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/956950e30a63fea8434f0fbe7efc2b428b629.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या.
9/10
![याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/093afd557957f5794513f757bb94885b76f87.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली.
10/10
![भारत सर्वबाद झाल्यावर फलंदाजीला ऑस्ट्रेलियाचा संघ आल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं आहे.दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/01/8c7a3bc2ce203acb97f6dd12cf343bb5b2f96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत सर्वबाद झाल्यावर फलंदाजीला ऑस्ट्रेलियाचा संघ आल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं आहे.दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले आहेत.
Published at : 01 Mar 2023 09:16 PM (IST)
Tags :
IND Vs AUSअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)