एक्स्प्लोर
Avinash Sable : बीडच्या अविनाश साबळेच्या कॉमनवेल्थमध्ये पदक विजयानंतर आई-वडिलांचा सन्मान, जिल्हाधिकाऱ्यांकडून खास सत्कार
Commonwealth Games 2022 : मराठमोठ्या अविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्टीपचेस शर्यतीत रौप्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली, ज्यानंतर देशभर त्याचं कौतुक होत आहे.

Avinash Sable Parents
1/9

महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे.
2/9

त्याच्या या कामगिरीनंतर देशभर त्याचं कौतुक होत असताना त्याच्या आई-वडिलांचाही खास सत्कार करण्यात आला आहे.
3/9

अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं होतं. एक महत्त्वाचं पदक भारताला मिळवून दिलेल्या अविनाशवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
4/9

बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोध शर्मा यांनी अविनाश याच्या मांडवा या गावी जाऊन त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला आहे.
5/9

अविनाश साबळे याच्या आई वडिलांच्या संस्कारामुळेच अविनाश खेळात आपलं यश संपादन करू शकला त्याचबरोबर मेहनतीच्या जोरावर अविनाशने यश संपादन केल असल्याचं शर्मा म्हणाले.
6/9

जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर अविनाश साबळेचे कुटुंबिय भारावून गेले होते.
7/9

या सत्कारानंतर अविनाशसोबत आम्हालाही सन्मान मिळाला अशी भावना साबळे कुटुबियांनी व्यक्त केली
8/9

काही दिवसांपूर्वी अविनाश साबळे एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम माझा कट्टावर आला असता त्याने अनेक आठवणींना उजाळा दिला.
9/9

अविनाश आता त्याचं लक्ष आगामी ऑलिम्पिक स्पर्धांवर केंद्रीत करत असून सुवर्णपदक जिंकण्याचा प्रयत्न करेल असंही म्हणाला आहे.
Published at : 18 Aug 2022 08:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
