दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातोय. पर्यावरणाचे संरक्षण आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
2/7
पृथ्वीच्या भोवताली असलेल्या ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हॉयलेट किरणं तिथेच थांबतात. त्यामुळे सजिवांचे संरक्षण होतं आणि जगातली अन्न सुरक्षाही शाबूत राहते.
3/7
पण मानवाच्या विविध कृत्यांमुळे प्रदुषणामध्ये वाढ होऊन या ओझोनच्या थराला छिद्रे पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी सजिवांचा जीव धोक्यात आला आहे.
4/7
1978 साली कॅनडातल्या मॉन्ट्रियल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस मुळे ओझोनच्या थरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चर्चा करण्यात आली.
5/7
वातावरणातील बदलाच्या संकटावर उपाय म्हणून ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. यावेळी मॉन्ट्रियल करार करण्यात आला.
6/7
हा करार आतापर्यंतचा सर्वात यशस्वी करार समजला जातो. या कराराला 197 देशांनी पाठिंबा दिला आहे.
7/7
जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी एक थीम तयार करण्यात येते. या वर्षीची थीम 'Montreal Protocol Keeping us, our food, and vaccines cool' अशी आहे.