एक्स्प्लोर
Ukraine Drone attack on Russia: युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स आतमध्ये आणली अन् रशियाची 41 लढाऊ विमानं खाक करुन टाकली
Ukraine massive drone attack on Russia: युक्रेनच्या 117 ड्रोनने 40 रशियन लढाऊ विमाने अन् 5 हवाई तळ केले उद्ध्वस्त; झेलेन्स्की म्हणाले, आमचं दीड वर्षाचं प्लॅनिंग होतं.
Ukraine massive drone attack on Russia
1/11

युक्रेनने रविवारी केलेल्या या ड्रोन हल्ल्यात रशियाची 41 लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत. हा युक्रेनने रशियावर केलेला आजवरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
2/11

या हल्ल्यासाठी ड्रोन्स कंटेनरमधून लपवून एका ट्रकमधून रशियाच्या आतल्या भागात नेण्यात आले. ट्रकवरील लाकडी छतांमध्ये हे आत्मघातकी ड्रोन्स लपवण्यात आले होते.
3/11

आत्मघातकी ड्रोन्स असलेला ट्रक रशियातील हवाई तळाच्या जवळ नेण्यात आला. तिथे गेल्यानंतर हे ड्रोन्स बाहेर काढून हल्ले करण्याची आल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
4/11

या हल्ल्यात युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या एक ते दीड वर्षांपासून अशाप्रकारच्या हवाई हल्ल्याची योजना आखली जात होती. या मोहिमेवर स्वत: राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर झेलेन्स्की लक्ष ठेवून होते.
5/11

या हल्ल्यात युक्रेनच्या गुप्तहेर खात्याने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या एक ते दीड वर्षांपासून अशाप्रकारच्या हवाई हल्ल्याची योजना आखली जात होती. या मोहिमेवर स्वत: राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर झेलेन्स्की लक्ष ठेवून होते.
6/11

युद्धभूमीपासून 4 हजार किलोमीटर आतमध्ये हा हल्ला करण्यात आला. यामध्ये रशियामधील चार महत्त्वाचे हवाई तळ लक्ष्य करण्यात आले. युक्रेनच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात रशियाची अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली सर्व विमाने नष्ट झाली आहेत.
7/11

युक्रेनने इर्कुत्सक, इव्हानोव्हा, रायझान, आमूर या पाच प्रांतांमध्ये युक्रेनने हल्ले केल्याची माहिती आहे. मर्मान्स्क आणि इर्कुत्सक येथील हवाई हल्ल्यात लढाऊ विमानांना आगी लागल्या. मात्र, ही आग विझवण्यात आली, अशी माहिती रशियाकडून देण्यात आली.
8/11

युक्रेनच्या एसबीयूच्या दाव्यानुसार, त्यांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाची टीयू-95, टीयू-22 सारखी बॉम्बर्स विमानं आणि ए-50 ही महागडी हेर विमाने नष्ट झाली. रशियाकडे फक्त दहा ए-50 होती. हे एक विमान 3000 कोटींचे आहेत. मात्र, युक्रेनच्या हल्ल्यात यापैकी काही विमाने नष्ट झाली आहेत.
9/11

युक्रेनच्या दाव्यानुसार, रशियाची सैनिकांना भोजन आणि इंधन घेऊन जाणारी एक मालगाडी स्फोटात उडवण्यात आली आहे. या स्फोटात एक पूल उद्ध्वस्त झाल्याने रशियाच्या ताब्यातील जापोरिज्जिया आणि क्रिमियालगतचा मॉस्कोच्या भागाचा संपर्क तुटला आहे.
10/11

तत्पूर्वी रशियाने शनिवारी रात्री युक्रेनवर ड्रोन हल्ले केले होते. शनिवारी रात्रभरात युक्रेनवर 472 ड्रोन हल्ले करण्यात आले, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली. यापैकी 382 ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे पाडण्यात आली. रशियाने युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे 12 सैनिक ठार झाले तर 60 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
11/11

या हल्ल्यानंतर युक्रेनचे लष्करी कमांडर मिखायलो ड्रापाती यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या नेतृत्त्वात युक्रेनने पूर्व सीमेवरील रशियाने ताब्यात घेतलेला भूभाग परत मिळवला होता.
Published at : 02 Jun 2025 10:15 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत



















