Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या दळभद्री कारभाराचा कहर; सकाळीच मतदानासाठी आलेल्यांची नावे सापडेनात, ईव्हीएमची बटन दाबेनात, काही ठिकाणी सुरु होण्यापूर्वीच बंद सुद्धा पडली
आयोगाच्या दळभद्री कारभाराचा पहिलाच फटका वनमंत्री गणेश नाईक यांना बसला. तब्बल एक तास फरफट झाल्यानंतर त्यांचं मतदान पूर्ण झालं, यावरून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा अंदाज येतो.

Maharashtra Municipal Election: निवडणूक आयोगाच्या एकामागून एक अशा धकादायक निर्णयानी संशय निर्माण केला असतानाच आज (15 जानेवारी) राज्यातील सर्वच मनपांसाठी सकाळी साडे सातला मतदान सुरू झाल्यानंतरही निवडणूक आयोगाचा दळभद्री कारभार पुन्हा एकदा समोर आला. आयोगाच्या दळभद्री कारभाराचा पहिलाच फटका वनमंत्री गणेश नाईक यांना बसला. तब्बल एक तास फरफट झाल्यानंतर त्यांचं मतदान पूर्ण झालं, यावरून निवडणूक आयोगाच्या कारभाराचा अंदाज येतो. अनेक ठिकाणी यादीमध्ये नाव सापडत नाही, अनेक ठिकाणी इव्हीएम बंद पडल्याच्या, काही ठिकाणी ईव्हीएमचे बटन दाबले जात नसल्याचं, तर काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव सापडत नसल्याच्या घटना सकाळपासून समोर येत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांची हेळसांड झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभाराचं करायचं तरी काय? असा संताप मतदारांमधून व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली.
नवी मुंबई
- एक तासाच्या धावपळीनंतर वनमंत्री गणेश नाईक आणि परिवाराचे मतदान पूर्ण
- गणेश नाईक यांचे निवडणूक आयोग यंत्रणेच्या घोळावर गंभीर आरोप
- यंत्रणा टू दी पॅांईट काम करीत नसल्याचा गणेश नाईक यांचा आरोप
- वनमंत्री गणेश नाईक आणि परिवार यांच्या परिवाराच्या मतदानाचा घोळ सकाळी 7.30 पासून सुरू होता
- दोन मतदान केंद्रावर फिरूनही गणेश नाईक आणि परिवाराचे नाव मिळत नव्हते. हा घोळ एक तास सुरू होता.
- अखेर कोररखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूल मधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक, सून कल्पना नाईक यांचे नाव मिळाले.
- मात्र पुतणे माजी महापौर सागर नाईक आणि त्यांची पत्नी यांचे नाव परिवारासह न येता वेगळ्या ठिकाणी आल्याचे दिसून आले. यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणारे संपुर्ण नाईक परिवार यावेळी मात्र निवडणूक आयोगाच्या घोळामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करावे लागले.
मीरा-भाईंदर
- मीरा-भाईंदरमध्ये मतदान जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काही ठिकाणी मतदार मतदान केंद्र शोधताना फिरताना दिसून येत आहेत.
- लालबाग चिवडा गल्ली येथे मतदान केंद्रावर मशीन अर्ध्या तासानंतर सुरू झाली. त्यामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधीर साळवी यांनी मतदान केंद्रावर कसं ताटकळत उभे राहावं लागलं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर
- गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ
- मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ
- तब्बल एक तास ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा गोंधळ
- मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर मशीन दुरुस्त करण्यास जवळपास एक तास विलंब झाला
- नागरिकांना जवळपास एक तास ताटकळत उभे राहावे लागले
सोलापूर
- सोलापुरातील संगमेश्वर पब्लिक स्कुल मधील ईव्हीएममध्ये बिघाड
- ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानात खोळंबा
- मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु
- सकाळी 7.30 वाजल्यापासून या केंद्रावर मतदान प्रक्रिया बंद होती
- तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन बंद होती
- मात्र, पाऊण तासांनी ही मशीन सुरु झाली
मुंबई
- कुर्ला पूर्व येथील कामगार नगरच्या पंत वालालवकर शाळेतील मतदान केंद्रावर गोधळ
- मतदारांची नावे, केंद्र, बूथ बदलल्याने गोंधळ वाढला
- नावे, बूथ शोधण्यासाठी निवडणूक कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा मतदारांचा आरोप
नागपूर
- प्रभाग 28 मधील आराधना नगर येथील जीआरके कॉन्व्हेंट मधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही.
- ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर आता मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती.
- सुमारे 40 मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली होती
इतर महत्वाच्या बातम्या




















