एक्स्प्लोर
Solapur Fire: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
Solapur News: सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीन च्या सुमारास लागली भीषण आग. सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत शनिवारी रात्री भीषण आग लागली होती.
Solapur Fire news
1/13

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात शनिवारी रात्री कारखान्याला भीषण आग लागली
2/13

या भीषण आगीत होरपळून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
3/13

सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास लागली भीषण आग
4/13

चार तास उलटून गेल्यानंतरही ही आग विझलेली नाही. कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडल्याची माहिती आहे
5/13

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
6/13

या कारखान्याचे मालक याठिकाणीच राहत होते. त्यांच्या कुटुंबातील काहीजणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
7/13

अग्निशमन दलाने आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले होते. तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती
8/13

घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली असून याठिकाणी पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे
9/13

या कारखान्यात टॉवेल तयार केले जायचे. या साहित्यामुळे आग पसरत गेल्याचे समजते.
10/13

ही आग इतकी भीषण होती की, रात्री संपूर्ण परिसर आगीच्या ज्वालांनी वेढला गेला होता.
11/13

लांब अंतरावरुनही या आगीच्या ज्वाला दिसत होत्या.
12/13

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, आकाशात आगीच्या प्रचंड ज्वाळा
13/13

सकाळ झाल्यानंतरही आग पूर्णपणे विझलेली नाही. आजुबाजूच्या अग्निशमन दलावरील गाड्या घटनास्थळी बोलवण्यात आल्या आहेत.
Published at : 18 May 2025 07:06 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















