एक्स्प्लोर
आंबोलीचा धबधबा पर्यटकांसाठी बंद, विकेंडसाठी गेलेल्या पर्यटकांचा हिरमोड, मोठी वाहतूक कोंडी
सिंधुदुर्गातील आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी अनेक पर्यटक या भागात येत असतात. विकेंडवार बघून येणाऱ्या पर्यटकांचा अंबोलीचा धबधबा बंद झाल्याने हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.
Sindhudurg Amboli Ghat
1/7

महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा शनिवारी हिरमोड झाला.
2/7

विकेंडला धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी आंबोली गाठली असतानाच, पोलीस प्रशासनाने दुपारी ४ वाजता अचानक मुख्य धबधबा बंद केल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
3/7

त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
4/7

या ठिकाणी एक झाड पडण्याचे कारण देऊन पोलिसांनी धबधबा बंद केला. विकेंड मज्जा करण्यासाठी शेकडो किलोमीटर लांबवरून गाड्या घेऊन येणाऱ्या पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे.
5/7

आता वनविभागाच्या माध्यमातून धोकादायक असलेलं ते झाडं तोडण्यात येत आहे. त्यामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्या पाशी पर्यटकांना बंद करण्यात आल्याने पर्यटक रस्त्यावर पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे.
6/7

मुख्य धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. गाड्यांच्या रांगा लागल्यामुळे स्थानिक वाहतुकीवरही परिणाम झाला.
7/7

आंबोलीत वर्षा पर्यटनाचा हंगाम सध्या जोमात असून, दर शनिवारी-रविवारी हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. अशा वेळी प्रशासनाने पर्यटकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं स्थानिकांकडूनही सांगितलं जात आहे.
Published at : 29 Jun 2025 05:53 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















