एक्स्प्लोर
छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या 1 हजार नाण्यांचा शिवभक्ताने केला संग्रह
दहा वर्षांपूर्वी छत्रपतींची प्रतिमा असलेली नाणी चलनात होती. परंतु आता चलनात नाहीत. ही दुर्मिळ नाणी चलनातून बाहेर गेल्यानंतर नामशेष होऊ नयेत म्हणून संतोष पाटलांनी ही नाणी संकलित करायचा निर्णय घेतला.

currency of Chhatrapati Shivaji maharaj
1/11

छत्रपती शिवाजी महाराजांची आज परंपरेने जयंती साजरी होत आहे. त्या निमित्ताने महाराजांची प्रतिमा असलेल्या दोन रुपयांच्या जवळपास 1000 नाण्यांचा संग्रह करणाऱ्या शिवप्रेमीची आज भेट घालून देत आहोत.
2/11

तासगाव तालुक्यातील नागाव कवठे गावचे संतोष उर्फ संताजी पाटील असे या शिवभक्तांचे नाव आहे.
3/11

त्यांनी 2002 सालापासून ही नाणी संग्रहित केली आहेत. छत्रपतींची प्रतिमा असलेल्या 1000 नाण्यांबरोबरच ज्ञानेश्वर माऊली यांची 150 आणि तुकाराम महाराजांची प्रतिमा असलेली 150 नाणी पाटील यांच्या संग्रहात आहेत.
4/11

संतोष यांचे गावातच एक छोटसं किराणामालाचं दुकान आहे. साधारण 2003 साली संतोष यांना छत्रपतींची प्रतिमा असलेली नाणी दिसून आली.
5/11

संतोष यांनी छत्रपतींची प्रतिमा असलेली नाणी संग्रह करायला सुरुवात केली. किराणा दुकानातून जे नाणं येतं होतं ते प्रत्येक नाणे संतोष बघून घ्यायचे आणि ज्यावेळी छत्रपतीची प्रतिमा असलेले नाणं हाती यायचं ते नाणे संतोष संग्रही ठेवत.
6/11

पुन्हा ते दुकानाच्या व्यवहारातून ही नाणे ग्राहकाकडे जाणार नाहीत याची खबरदारी घेत असत. अशा पद्धतीने संतोष यांनी आजपर्यंत हा एवढा मोठा हा संग्रह केलेला आहे.
7/11

साधारण दहा वर्षांपूर्वी छत्रपतींची प्रतिमा असलेली नाणी चलनात होती. परंतु आता जी नवीन नाणी आलेली आहेत त्यात ही चलनात नाहीत.
8/11

ही दुर्मिळ नाणी चलनातून बाहेर गेल्यानंतर नामशेष होऊ नयेत म्हणून संतोष पाटलांनी ही नाणी संकलित करायचा निर्णय घेतला.
9/11

केवळ छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी संतोष यांनी गेल्या काही वर्षापासून छत्रपतींची प्रतिमा असलेली नाणी संकलित करण्याचा उपक्रम सुरू केला जो आज जवळपास 1000 नाण्यांचा संग्रहापर्यंत गेला आहे.
10/11

संतोष पाटील यांनी छत्रपतीची प्रतिमा असलेली नाणी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर जिजाऊ मा साहेबांचे वंशज नामदेवराव जाधव यांना देखील दाखवले आहेत.
11/11

छत्रपती उदयनराजेंनी तर संतोष पाटील यांनी छत्रपतींच्या प्रतिमेच्या नाण्यांच्या केलेल्या संग्रहाबद्दल एक प्रोत्साहन पत्र देखील दिलं आहे.
Published at : 22 Apr 2023 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion