एक्स्प्लोर
Kashedi Tunnel: कशेडी बोगद्यातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू; पाहा फोटो
Kashedi Tunnel : गणेशोत्सवात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कशेडी बोगदा हा गणेशोत्सवापूर्वीच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
Kashedi Tunnel: कशेडी बोगद्यातील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू; पाहा फोटो
1/11

कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.
2/11

गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे.
3/11

पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
4/11

बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे.
5/11

तयार काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो त्याचा दर्जा ढासळतो.
6/11

रस्त्याला पावसाचे पाणी लागू नये म्हणून 15 मीटर लांबीचे दोन शेड बनवत काँक्रीटीकरण काम जोरात सुरू आहे.
7/11

उल्हासनगरमधील एका कंपनीच्या माध्यमातून हे काम केले जात आहे.
8/11

सोमवारी मध्यरात्रीपासून बोगद्यातील काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
9/11

गणेशोत्सवापूर्वीच या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न होणार आहे.
10/11

नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो.
11/11

तर जड वाहनांसाठी जवळपास 40 मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात
Published at : 11 Jul 2023 10:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
पुणे
व्यापार-उद्योग
























