kargil Vijay Din Indapur: इंदापुरात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
By : शिवानी पांढरे | Updated at : 26 Jul 2022 01:00 PM (IST)
Pune
1/6
इंदापूर शहरात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.भारतीय सैन्यातील माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातून घोषणा देत तिरंगा रॅली काढली.
2/6
सर्व महापुरूषांना अभिवादन करत नगरपरिषद प्रांगणातील स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पन करत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पन केली आहे.
3/6
इंदापूर शहरातील पुणे सोलापूर महामार्गावरील छत्रपती मालोजीराजे भोसले चौकातून दुचाकीवरुन या तिरंगा रॅलीला सुरवात झाली.
4/6
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पन करुन ही तिरंगा रॅली श्रीराम चौक,नेहरू चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून नगरपरिषद प्रांगणात दाखल झाली.
5/6
या ठिकाणी असलेल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभास कारगील युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांना पुष्पचक्र अर्पन करण्यात आले.
6/6
दरम्यान युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सर्व माजी सैनिक बांधवांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.