एक्स्प्लोर
PHOTO : दौंडमध्ये खासगी बस आणि ट्रकची भीषण धडक, चार जणांचा मृत्यू
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील भांडगाव येथे खाजगी बस आणि ट्रकचा पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस हून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
Pune Solapur National Highway Accident
1/7

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील भांडगाव येथे खाजगी बस व ट्रकचा पहाटे भीषण अपघात झाला.
2/7

या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वीस हून अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
3/7

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघाली होती.
4/7

बसचा अचानक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोठ्या ट्रकला ही बस जाऊन ही बस धडकली.
5/7

या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे.
6/7

अपघातात जखमींना नजीकच्या केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये तसेच पुण्याला हलविण्यात आले आहे.
7/7

या अपघातातील मृतांमध्ये पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांचा समावेश आहे.
Published at : 01 Feb 2023 10:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
करमणूक
मुंबई
























