एक्स्प्लोर
भाजप प्रवेशाच्या चर्चांना फुल्लस्टॉप, तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर; ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या...
मी पक्षात नाराज होते, पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.
Tejaswi ghosalkar meet uddhav Thackeray
1/7

मी पक्षात नाराज होते, पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत, असे मुंबईतील माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.
2/7

मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही, असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असेही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज मातोश्रीवर जाऊन तेजस्वी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.
3/7

मुंबई बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती झाल्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या पक्षात नाराज आहेत असं म्हटलं जात होते, त्यामुळे ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्यामुळे त्यांची पक्षातील नाराजी दूर झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे
4/7

तेजस्वी घोसाळकर यांची नुकतीच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये (BJP) जातील, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी तेजस्वी घोसाळकर यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
5/7

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या ठाकरेंची सेना सोडण्याची चर्चा सुरु असताना विनोद घोसाळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आपण आणि आपल्या सून उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
6/7

दरम्यान, खासदार संजय राऊतांनी अभिषेक घोसाळकरांचं नाव घेताच विनोद घोसाळकर भावुक झाल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी घोसाळकर यांच्या स्नुषा तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर घोसाळकरांनी मातोश्रीवर जाणं महत्त्वाचं मानलं गेलं.
7/7

आपल्या सुनेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला होता. त्यामुळे, तेजस्वी यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.
Published at : 22 Jun 2025 06:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























