एक्स्प्लोर
मुंबई दौऱ्यावेळी अमित शाहांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या घरी हजेरी; आवर्जुन उपस्थित राहत गणरायाचं घेतलं दर्शन
Sharad Pawar Ganesh Darshan: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत गणपती दर्शन घेतलं.
CM Eknath Shinde
1/9

CM Eknath Shinde : मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
2/9

मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जात गणरायाचं दर्शन घेतलं.
3/9

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचं स्वागत केलं.
4/9

मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केलं.
5/9

तसेच, त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली.
6/9

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
7/9

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
8/9

अमित शाहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होतं.
9/9

त्यासोबतच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी संपूर्ण फडणवीस परिवाराची आस्थेनं विचारपूस केली.
Published at : 09 Sep 2024 02:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























