एक्स्प्लोर
Virar Accident : रेतीची वाहतूक करणारा टिपर पलटी झाल्याने अपघात; महिलेचा मृत्यू, दोन जण जखमी
Virar Accident : विरार इथे एक आयवा टिपर पलटी झाल्याने त्याखाली येऊन एक जण मयत तर दोन जण जखमी झाले आहेत.
Vasai Accident
1/9

विरार इथे एक आयवा टिपर पलटी झाल्याने त्याखाली येऊन एक जण मयत तर दोन जण जखमी झाले आहेत.
2/9

जखमी पती पत्नी असून त्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
3/9

विरारच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटा येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
4/9

रेतीने भरलेला आयवा टिपर गाडी रस्त्याने चाललेली होती, त्याचवेळी राँग साईडने पिक गाडी आली.
5/9

यामुळे टिपर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. यावेळी आयवा गाडीच्या समांतर मोटारसायकलने जाणारे तीन जण गाडीखाली आले.
6/9

यात सुचिता सुजीत शेलार (वय 35 वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला.
7/9

तर अशोक शुक्ला आणि त्यांच्या पत्नी रमा शुक्ला हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
8/9

वसई विरार अग्निशमन दलाचे पथक आणि अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. तीन क्रेन आणि जेसीबीच्या साहय्याने आयवा गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
9/9

या आयवा टिपरखाली आणखी कोणी दबलं असेल का याचा ही शोध पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.
Published at : 14 Apr 2023 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
