एक्स्प्लोर
Palghar Fort: मराठा साम्राज्याच्या विजयी इतिहासाकडे दुर्लक्ष? केळवे पाणकोट जंजिरा किल्ला मोजतोय शेवटच्या घटका!
Palghar Fort: मराठा मावळ्यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवून जिंकलेल्या केळवे पाणकोट जंजिरा किल्ल्याची दुरवस्था होत असून काही भाग ढासळू लागला आहे.
Palghar Fort: मराठा साम्राज्याच्या विजयी इतिहासाकडे दुर्लक्ष? केळवे पाणकोट जंजिरा किल्ला मोजतोय शेवटच्या घटका!
1/9

पालघरमधील केळवे या प्रसिद्ध पर्यटन स्थळी असलेला केळवे पाणकोट जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला आहे.
2/9

सध्या समुद्रांच्या लाटांमुळे हा किल्ला ढासळू लागला असून दुर्ग प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
3/9

या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 450 वर्षांपूर्वी करण्यात आली.
4/9

10 जानेवारी 1793 साली मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला होता.
5/9

त्यानंतर याच किल्ल्याचा आधार घेत पुढे शिरगाव, डहाणू, तारापूर येथील किल्ले आपल्या ताब्यात घेण्यात मराठ्यांना यश आलं.
6/9

मात्र हाच केळवे पाणकोट जंजिरा किल्ला सध्या शेवटच्या घटका मोजू लागला आहे.
7/9

समुद्राच्या वारंवार बसणाऱ्या लाटांमुळे या किल्ल्याचा काही भाग ढासळू लागला आहे.
8/9

या किल्ल्याच्या दुरुस्तीची मागणी किल्ले संवर्धन प्रेमींकडून भारतीय पुरातत्त्व विभाग आणि केळवे ग्रामपंचायतकडे करण्यात आली आहे.
9/9

तसंच या किल्ल्याच्या संवर्धनात श्रमदानाची आवश्यकता असल्यास दुर्ग संवर्धन मंडळ तयार असल्याच आश्वासन ही दुर्गप्रेमींकडून देण्यात आले आहे .
Published at : 14 Jan 2023 09:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व























