एक्स्प्लोर
PHOTO : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरेंकडून होलिकादहन
Amit Thackeray at Worli Koliwada 7
1/5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी होळीसाठी मुंबईतील प्रसिद्ध वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली.
2/5

महत्त्वाचं म्हणजे वरळी हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
3/5

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अमित ठाकरे यांनी हजेरी लावल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी वरळीवर विशेष लक्ष दिल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
4/5

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि उत्साहाच्या वातावरणात कोळीवाड्यात होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कोळी बांधवांसह स्थानिकांनी गर्दी केली होती.
5/5

मुंबई आणि राज्यभरात आज होळी साजरी केली जाणार असली तरी मुंबईतल्या कोळीवाड्यात होळीच्या सणाला एक दिवस आधीच सुरुवात झाली आहे. कोळी बांधव परंपरा जपत हा सण साजरा करत असल्याचं पाहायला मिळालं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करतात आणि होळी दहन करुन गाण्यावर ठेका धरतात.
Published at : 17 Mar 2022 01:11 PM (IST)
आणखी पाहा























