एक्स्प्लोर
Mumbai Building Collapsed : मुंबईतील दुमजली इमारत कोसळून दुर्घटना, ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची भीती
Mumbai Vidyavihar Building Collapsed : मुंबईतील घाटकोपर येथील दुमजली इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai Building Collapsed
1/9

विद्याविहारमधील राजावाडी कॉलनी येथील इमारतीचा भाग कोसळला. दुर्घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत.
2/9

युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती असून त्यांचा शोध सुरु आहे.
3/9

मुंबईच्या विद्याविहार येथील जुन्या दुमजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
4/9

ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.
5/9

अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
6/9

मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळो धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
7/9

दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
8/9

वसईमध्येही इमारतीचा काही भाग कोसळला आहे. वसईमधील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
9/9

अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू ही झाला नाही तरी जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Published at : 25 Jun 2023 02:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























