एक्स्प्लोर
Weather Update : चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक! आज 5 राज्यांत अतिवृष्टीचा इशारा..
Weather Update : चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक! आज 5 राज्यांत अतिवृष्टीचा इशारा..
IMD Weather Prediction
1/10

बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ 'हामून' धोकादायक बनले आहे. (Photo Credit : unsplash)
2/10

त्याच्या प्रभावामुळे आज देशातील 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo Credit : unsplash)
3/10

पुढील 12 तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Photo Credit : unsplash)
4/10

तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटनंतर आता तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. (Photo Credit : unsplash)
5/10

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत असल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच राज्यात थंडीची चाहूल लागण्याची चिन्हे आहेत. (Photo Credit : unsplash)
6/10

खाजगी हवामान वेबसाईट स्कायमेटनुसार, तीव्र चक्रीवादळ 'हॅमून' आता उत्तर-पूर्वेकडे सरकले आहे. (Photo Credit : unsplash)
7/10

25 ऑक्टोबर रोजी दुपारी या चक्रीवादळाने चितगावच्या दक्षिणेला बांगलादेश किनारा ओलांडला होता. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किमी दरम्यान राहील. (Photo Credit : unsplash)
8/10

सध्या हे वादळ कमकुवत होऊन खोल दबावात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज कमकुवत होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.(Photo Credit : unsplash)
9/10

त्याच बरोबर आणखी एक समान चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किमी उंचीवर असल्याचं देखील हवामान खात्याने म्हटंलय(Photo Credit : unsplash)
10/10

यासोबतच संबंधित राज्य सरकारांना वादळाच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यासाठी पथके तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (Photo Credit : unsplash)
Published at : 26 Oct 2023 01:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























