एक्स्प्लोर
अवघा महाराष्ट्र झाला तुझ्या चरणी गोळा! रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा, पाहा फोटो
Shivrajyabhishek Din 2024 : आज रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आलाय.

Shivrajyabhishek Din 2024
1/8

शिवराज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचं हे 351 वे वर्ष आहे.
2/8

तिथीनुसार झालेल्या या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदय सामंत देखील हजर होते.
3/8

कार्यक्रमावेळी रायगडावरती राज दरबारामध्ये आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे असे बॅनर झळकले
4/8

विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असा आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणावेळी दिले
5/8

सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 350 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं.
6/8

अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो.
7/8

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर आले होते.
8/8

प्रचंड धुके, पाऊस होता तरी रायगडावरील शिवभक्तांचा उत्साह थोडाही कमी नव्हता
Published at : 20 Jun 2024 06:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
