एक्स्प्लोर
Shivrajyabhishek Din Photo: रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याची क्षणचित्रे... पाहा फोटो
Shivrajyabhishek Din 2023 : रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
shivrajyabhishek din 2023
1/9

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
2/9

शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
3/9

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते.
4/9

या सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली. या सोहळ्याला धनगर नृत्यानं तर आगळीच बहार आणली.
5/9

छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला.
6/9

या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.
7/9

रायगडावर एका शिवभक्ताने सोनं आणि चांदीचं नक्षीकाम असलेली तलवार आणली होती. या तलवारीची निर्मिती शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी करण्यात आली होती. तसेच देशभरातील 21 नद्यांचं पाणीही अभिषेकासाठी आणण्यात आलं होतं.
8/9

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. या शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमून गेला होता.
9/9

तिथी आणि तारीखेप्रमाणे अवघ्या चार दिवसांत शिवराज्याभिषेकाचे दोन सोहळे झाले आणि शिवप्रेमींकडून दोन्ही सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Published at : 06 Jun 2023 07:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























