एक्स्प्लोर
Samruddhi Highway Accident : शिर्डी भरवीर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
नुकत्याच उद्घाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर पहिलाच अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे.
Samruddhi Highway Accident
1/9

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे.
2/9

नुकत्याच उद्घाटन केलेल्या शिर्डी ते भरवीर महामार्गावर पहिलाच अपघात झाला आहे.
3/9

या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते आहे.
4/9

शिर्डी ते भरवीर समृद्धी महामार्गावरील सिन्नरच्या पूर्व भागात हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे.
5/9

मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी कार नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातून जात होती.
6/9

त्यावेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून शिर्डीकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर जाऊन आदळली.
7/9

यात कार दोन तीन वेळा उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
8/9

26 मी रोजी नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
9/9

या उद्घाटन सोहळ्यास आठ दिवस होत नाही तोच भीषण अपघात घडला आहे.
Published at : 03 Jun 2023 12:39 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण




















