एक्स्प्लोर
Balu Mama : बाळूमामाच्या नावानं चांगभलं! मामांच्या नावावर काही लोक पैसे गोळा करत असल्याने निषेधाचा ठराव
बाळूमामा
1/9

लोकसंत अशी ओळख असलेले बाळूमामा यांच्या भक्तात सध्या चांगलाच बेबनाव सुरु झाला असून बाळूमामांच्या नावावर काही मंडळी पैसे गोळा करीत असल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव बाळूमामांचे समाधिस्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर या गावाने केला आहे. बाळूमामा यांच्या जीवनावरील मालिका सध्या टीव्हीवर जोरात सुरु असल्याने बाळूमामा यांच्याबाबत मोठी उत्सुकता सर्वसामान्य भक्तांमध्ये निर्माण होत आहे. (photo courtesy : www.balumamamandir.org)
2/9

बेळगाव जवळील चिक्कोडी येथे सर्वसामान्य धनगर कुटुंबात 3 ऑक्टोबर 1892 साली जन्मलेले बाळूमामा अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून संतश्रेष्ठ बनले. अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्याचे कार्य करताना बाळूमामा यांनी अनेक चमत्कार केले. आयुष्यभर घराचा संसार सोडून बाळूमामा यांनी गोरगरिबांचे दुःख दूर करण्याचे काम केले होते. अशा या संतश्रेष्ठ बाळूमामा यांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथे आपला देह ठेवला होता. (photo courtesy : www.balumamamandir.org)
Published at : 29 Aug 2021 08:03 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























