रायगड जिल्ह्यातील रोहा येथे दुर्मिळ असलेल्या उडता सोन सर्प आढळून आला आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच आढळून आलेल्या या सापामुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
2/5
रोहा तालुक्यातील डोंगरी येथे राहणाऱ्या अमोल देशमुख यांच्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये साप दिसून आल्याने त्यांनी सर्पमित्रांना पाचारण केले होते. यावेळेस, रोहा येथील सर्पमित्रांना परिसरात आढळणाऱ्या प्रजातीं व्यतिरिक्त नवीन प्रजातीचा साप असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी या सापाची सुटका करून सहकारी मित्रांकडून अधिक माहिती घेतली असता तो उडता सोन सर्प असल्याचे निदर्शनास आले.
3/5
या सापाला इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो.
4/5
दरम्यान, या सापाची माहिती मिळताच उरण येथील वन्यजीव निसर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी रोहा येथे जाऊन या दुर्मिळ सापाची पाहणी केली. या सापाची लांबी ही सुमारे 2 फूट 5 उंच असून तो निमविषारी प्रवर्गातील असल्याचे सांगण्यात आले.
5/5
रोहा येथील वनविभागामार्फत या दुर्मिळ सापाचा पंचनामा करण्यात आला. या सापाला रोहा येथील कोंबर गावच्या डोंगरात सुरक्षित सोडण्यात आलं. रायगड जिल्ह्यात प्रथमच दिसून आलेल्या या दुर्मिळ प्रजातीमुळे सर्पमित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.