एक्स्प्लोर
PHOTO : शिर्डीत दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता

Ram Navami
1/7

Ram Navami : शिर्डी येथील साई मंदिरात तीन दिवस चाललेल्या रामनवमी उत्सवाची आज काल्याच्या किर्तनानंतर पारंपारिक पद्धतीने दहिहंडी फोडून सांगता झाली.
2/7

साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आणि त्यांचे पती संजय धिवरे यांच्या हस्ते गुरूस्थान मंदिरात रूद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर साईमंदिरात दहिहंडी फोडण्यात आली.
3/7

रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात तीन लाखांहून अधिक भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली.
4/7

एक लाख साठ हजार भाविकांनी साई प्रसादालयात मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.
5/7

शिर्डी ग्रामस्थांकडून रामनवमीनिमित्त बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा, लोकनाट्य तमाशासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
6/7

पुढील तीन दिवसांत उर्वरीत कार्यक्रम पार पडणार आहेत.
7/7

शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालख्यांच्या आगमनाने साईनगरीत उत्साहाचे वातावरण होते.
Published at : 11 Apr 2022 08:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
