एक्स्प्लोर
PHOTO : ड्रोनच्या नजरेतून टिपलेली समृद्धी महामार्गाची सायंकाळच्या वेळची विहंगम दृश्ये
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ड्रोनच्या माध्यमातून सायंकाळच्या वेळी काढण्यात आलेली विहंगम छायाचित्रे पाहा...

Samruddhi Mahamarg
1/10

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
2/10

समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी (कोकमठाम) हे 520 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गाचे शिर्डी ते मुंबई दरम्यानचे काम जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
3/10

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये इतकी आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
4/10

या महामार्गावर प्राथमिक टप्प्यात 138.47 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
5/10

राज्यातील 10 जिल्हे, 25 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 25 इंटरचेंज असून महामार्गालगत 18 नवनगरे असतील. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
6/10

महामार्गावर 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 32 पूल असून लहान पुलांची संख्या 317 आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
7/10

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किमी असून रुंदी 120 मीटर (डोंगराळ भागासाठी 90 मी.) आहे. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
8/10

यात 3+3 अशा 6 मार्गिकांचा समावेश असून त्यावर वाहनाचा प्रस्तावित वेग प्रति तास १२० किमी असेल. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
9/10

नागपूर-मुंबई दरम्यान गतिमान वाहतुकीसाठी 31 ऑगस्ट 2015 रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बनवण्याची विधानसभेत घोषणा करण्यात आली होती. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
10/10

हा महामार्ग विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (फोटो : MAHARASHTRA DGIPR Twitter Account)
Published at : 10 Dec 2022 08:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion