एक्स्प्लोर
Rohit Pawar : आमदार रोहित पवार बळीराजाच्या बांधावर... हातात यंत्र घेऊन कुळपणी!
Rohit Pawar
1/7

कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. (Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
2/7

सध्या रोहित पवार चर्चेत आहेत त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. रोहित पवार यांनी त्या पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून नेटकरी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
3/7

काल (बुधवार) 30 जून रोजी कर्जतमधील दत्ता पाडुळे यांच्या शेतात भेट दिली. त्यावेळी रोहित पवार यांनी यंत्र चालवून कोळपणीही केली. (Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
4/7

"वेळेवर पाऊस पडल्याने मतदारसंघातली पिकं जोमात आलीत आणि सध्या खुरपणी, कोळपणीची कामं वेगात सुरू आहेत. काल कर्जतमध्ये दत्ता पाडुळे यांच्या शेतात यंत्राद्वारे कोळपणी सुरू असताना मीही ते यंत्र चालवून बघितलं. यावेळी स्थानिक शेतकरी आणि इथं खुरपणाऱ्या महिला भगिनींसोबतही चर्चा केली.", या कॅप्शनसह रोहित पवार यांनी कोळपणी करतानाचे आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
5/7

एवढंच नाहीतर रोहित पवार यांनी मतदार संघातील शेतकरी आणि खुरपणी करणाऱ्या महिलांशीही चर्चा केली. (Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
6/7

(Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
7/7

(Photo Credit : @RRPSpeaks/Twitter)
Published at : 01 Jul 2021 03:00 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















