एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (unseasonal rain) इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News
1/9

दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे.
2/9

भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (unseasonal rain) इशारा देण्यात आला आहे.
3/9

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
4/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
5/9

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6/9

विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यात देखील उद्या आणि परवा विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
7/9

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
8/9

विदर्भात 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
9/9

शेतकऱ्यांना गारपिटीपासून पिकांना वाचवण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
Published at : 26 Nov 2023 03:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















