एक्स्प्लोर
Bhiwandi News : भिवंडीत मुसळधार पावसाची दाणादाण! नदी, नाले हाऊसफुल्ल , सखल भागात पाणीच पाणी!
Bhiwandi News : राज्यातील बहुतांश भागात आज दमदार पावसाने झोडपून काढलंय. अशातच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील दुपारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीय.
Bhiwandi News
1/10

राज्यातील बहुतांश भागात आज कोसळलेल्या दमदार पावसाने अनेक जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढलंय.
2/10

अशातच, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दुपारपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीय.
3/10

दमदार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
4/10

यात भाजी मार्केट, तीन बत्ती, नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे.
5/10

ज्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लगततोय.
6/10

तर भाजी मार्केट, तीन बत्ती परीसरात गुडघाभर पाणी साचले होते.
7/10

मागील काही दिवसांपासून गर्मीने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
8/10

यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनाही मोठा आनंद झाला आहे.
9/10

आगामी काळात देखील पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.
10/10

मात्र, आज अचानक आलेल्या पावसाने मात्र काही काळ एकच दाणादाण उडवल्याचे चित्र बघायला मिळाले आहे,
Published at : 24 Aug 2024 07:38 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















