एक्स्प्लोर
Rain Update: राज्यातील 'या' 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या विभागातील पावसाची स्थिती
Maharashtra Rain Update: सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Update
1/7

राज्यात मागील तीन-चार दिवस पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला होता, पण आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
2/7

राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
3/7

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसू शकतो.
4/7

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
5/7

ठाणे, पालघरसह मुंबईला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, येथे आज तुरळक पाऊस हजेरी लावेल.
6/7

त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
7/7

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.
Published at : 02 Aug 2023 09:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
बीड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
