एक्स्प्लोर
Rain : आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा कोणत्या विभाग कोणता अलर्ट
राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain
1/9

राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पावसानं (Heavy Rain) धुमकूळ घातला आहे.
2/9

पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.
3/9

मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
4/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
5/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
6/9

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7/9

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8/9

. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडजिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय.
9/9

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 26 Jul 2023 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
