एक्स्प्लोर
Rain : राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain
1/9

राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/9

वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
3/9

रिसोड तालुक्यातील कोयाळी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगला पाऊस बरसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
4/9

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
5/9

पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
6/9

मुंबईसह ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली.
7/9

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. गेल्या तीस वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता.
8/9

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले आहेत.
9/9

पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.
Published at : 14 Jul 2023 09:18 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























