तळकोकणातील सिंधुदुर्गमधील आंबोलीत सध्या ऊन, पाऊस, धुक्याचा खेळ पहायला मिळत आहे.
2/6
कोकणात पावसाळ्यात जसं निसर्गाच वेगळं रूप पाहायला मिळत तसच काहीसं निसर्गाचं वेगळं रूप श्रावण महिन्यात पाहायला मिळतं.
3/6
सप्तरंगी इंद्रधनुष्य, क्षणार्धात धुक्याने व्यापून टाकणाऱ्या दऱ्या, मध्येच येणारी पावसाची सर हे सारं दृश्य सध्या आंबोलीत अनुभवता येत आहे.
4/6
म्हणूनच कोकणाला स्वर्ग म्हटलं जातं. हेच स्वर्ग सुखएबीपी माझाने आपल्यासाठी घेऊन आलंय. थेट देवभूमीतुन म्हणजेच सिंधुदुर्गातील आंबोलीतून.
5/6
डोळ्याचं पारणं फेडणारी दृश्य आहेत आंबोलीतील. आंबोली घाटातून ये जा करताना हा नजारा अनुभवता येतो. घाटात निसर्गाने ढगांची जणू चादरच पसरली असा अनुभव आंबोलीत सध्या अनुभवता येतोय. जैवविविधतेने नटलेल्या आंबोलीत सध्या निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळत आहे.
6/6
निसर्गाने पांघरलेला हिरवागार शालू डोंगर दऱ्यांवर पसरलाय असं वाटतं, या निसर्गाचं वेगळंच रूप नजरेस पडतं. ढगांची चादर जणू घाटातील खोल दरीवर पांघरलेली असा भास होतो. त्यामुळे याठिकाणी गेल्यानंतर काश्मीरमध्ये गेल्याचा भास होतो. धुकं आणि ढगांची चादर यामुळे आंबोलीतील नजारा काही औरच आहे. अनेक पर्यटक ये जा करत असताना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यात कैद करताना आंबोली घाटात दिसत आहेत.